बांगलादेशमध्ये ‘पीसी टीव्ही’ प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई येथील इस्लामिक रीसर्च फाउंडेशनच्या वतीने पीस टीव्ही चालवला जातो व त्यावर नाईक यांची भाषणे प्रसारित केली जात असतात. बांगलादेश सरकारने भारतीय मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईक यांच्या इस्लामी संघटनांशी असलेल्या संबंधांची चौकशी सुरू केली होती. दरम्यान दोन क्रूर दहशतवादी हल्ल्यात २५ जण ठार झाल्यानंतर त्यांच्या प्रक्षोभक भाषणांच्या पाश्वभूमीवर बांगलादेशमध्ये ‘पीसी’ टीव्ही प्रसारणांवर बंदी घालण्याची मागणीने जोर धरला होता. अखेर बांगलादेश सरकारने त्यांच्या भाषणावर निर्बंध घालण्याच्या उद्देशाने ‘पीसी टीव्ही’ प्रेक्षेपणावर बंदी घालण्याची कारवाई केली. देशभरातील भारत या संदर्भात बांगलादेशला पुर्ण सहकार्य करत असून भारतामध्येही मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईक संरक्षण यंत्रणेच्या रडारवर आहे. भारतामध्ये ‘पीसी टीव्ही’ला परवानगी नसली तरी काही केबलचालक या टीव्ही चॅनेलचे प्रेक्षेपण करत आहेत. भारत सरकारने या विरोधात देखील कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत. बांगलादेशमधील ‘पीसी टीव्ही’च्या बंदी नंतर भारतामध्येही झाकीर नाईक विराेधीतील चौकशी गतीमान होण्याची शक्यता आहे. चौकशीमध्ये झाकीर नाईक दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे भारत सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा