बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अश्रफुल याला बांगलादेश क्रिकेट मंडळाने मंगळवारी निलंबित केले. त्याच्यावर बांगलादेश प्रिमियर लीगदरम्याम मॅच फिक्सिंग व स्पॉट फिक्सिंगचे आरोप ठेवण्यात आले आहेत. आयसीसीच्या भ्रष्टाचार आणि सुरक्षा समितीचा अहवाल मिळेपर्यंत त्याचे निलंबन कायम राहणार आहे.
अश्रफुलने फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचे कबुल केले असून, त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटपासून निलंबित करण्यात आले असल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी सांगितले.
“अश्रफुलने त्याचा ‘एसीएसयू’ टीमसोबत मॅच फिक्सिंगमध्ये सहभाग असल्याचे कबुल केले आहे. त्यामुळे आम्ही त्याला तपासाचा अहवाल मिळेपर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळू देणार नाही.”, असे हसन पत्रकारांना म्हणाले.

Story img Loader