Bangladesh Crisis Interim Government Apologized to Hindus : बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे. देशभर गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार होत आहे. अशातच आता धार्मिक कट्टरतावादी बांगलादेशमधील अल्पसंख्यांक हिंदूंवर अत्याचार करू लागले आहेत. हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत आहेत, हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांची त्यांची घरं पेटवली जात आहेत, मंदिरांची नासधुस-तोडफोड होत आहे. त्यानंतर अल्पसंख्याक हिंदूंनी देखील आंदोलन सुरू केलं आहे. दरम्यान, बांगलादेशमधील हंगामी सरकारमधील गृह विभागाचे सल्लागार शखावत हुसैन यांनी मान्य केलं आहे की त्यांच्या देशात अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना सुरक्षा पुरवण्यात बांगलादेशी सरकार व सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली आहे.

जनरल एम. शखावत हुसैन यांनी बांगलादेशमधील हिंदूंची माफी मागितली आहे. तसेच त्यांनी माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष आवामी लीगवर हिंसाचार पसरवण्याचा आरोप करत कारवाईचा इशारा दिला आहे. शखावत हुसैन यांनी बांगलादेशातील हिंदू समुदायाची माफी मागितली आहे. सरकार त्यांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याची खंत हुसैन यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “या सगळ्याला केवळ सरकारचं नव्हे तर येथील बहुसंख्याकांचा समुदाय जबाबदार आहे. तसेच आम्ही देखील आमचं कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरलो आहोत. आता परिस्थिती आमच्या नियंत्रणात येत आहे. लवकरच स्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.

Bahujan samaj vidhan sabha election 2024
बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
terror among the villagers after tiger kills man in melghat
मेळघाटात वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाचा मृत्‍यू ; गावकऱ्यांमध्‍ये दहशत
maharashtra assembly election 2024 Congress High Command started efforts for the return of the rebels in gondia
‘हायकमांड’चा आदेश अन् गोंदियातील काही बंडखोर नरमले, तर काही ठाम
Pune Crime Unsafe City Pune City Issues Education Assembly Election 2024
लोकजागर : ‘पुण्य’कीर्तीचे पतन
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
bjp vs ncp sharad pawar
सोलापुरात बालेकिल्ला राखण्यासाठी भाजप राष्ट्रवादीत चुरस

शखावत यांनी यावेळी शेख हसीना यांच्या पक्षातील लोकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते म्हणाले, आवामी लीगच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.

हे ही वाचा >> Bangladesh Crisis: VIDEO: “लक्षपूर्वक ऐका, आरडाओरडा करून काहीही…”, भारतात प्रवेश करू इच्छिणाऱ्या बांगलादेशींना जवानाने समजावलं

अंतरिम सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

बांगलादेशमधील नोबेल पुरस्कारप्राप्त अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार म्हणून शपथ घेतली आहे. देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर मोहम्मद युनूस यांनी देशाच्या कारभाराची सूत्रे आपल्या हातात घ्यावी, अशी मागणी विद्यार्थी आंदोलक करत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मी सरकारचा सल्लागार म्हणून काम करेन, अशी ग्वाही मोहम्मद युनूस यांनी दिली होती. त्यानुसार ते बांगलादेशला परतले व त्यांनी देशाची कमान आपल्या हातात घेतली आहे. बांगलादेशमधील लष्कराने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पूर्ण समर्थन देण्याचा निर्णय घेतला असला तरीही त्यांना देशात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अनेक आघाड्यांवरील आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बांगलादेशमध्ये चालू असलेला हिंसाचार ते किंवा बांगलादेशी लष्कर थांबवू शकलेलं नाही.