Bangladesh Crisis UN Report : बांगलादेशमधील हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. हा हिंसाचार पाहून, जनतेचा उद्रेक पाहून शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केलं आहे. गेल्या २० ते २५ दिवसांत देशभर झालेल्या हिंसाचारात ६५० लोकांचा बळी गेला आहे. तसेच शेकडो लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अल्पसंख्याकांची संख्या मोठी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात बांगलादेशमधील अराजकतेबाबतची माहिती व आकडेवारी सादर करण्यात आली आहे. यूएनएचसीआरच्या (संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त) अहवालानुसार १६ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान बांगलादेशातील हिंसाचारात ४०० लोकांचा बळी गेला आहे. तर, ५ व ६ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारात २५० हून अधिक लोक मारले गेले आहेत. शेकडो लोक जखमी झाले आहेत. तर, शेकडो कुटुंबं बेघर झाली आहेत. याच हिंसाचारामुळे शेख हसीना यांनी बांगलादेशमधून पलायन केलं आहे.

१६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान विद्यार्थी व तरुणांच्या आंदोलनानंतर उफाळलेल्या हिंसेत ६५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये अल्पसंख्याक हिंदू सर्वाधिक आहेत. तसेच यात इतर अल्पंख्याक, पत्रकार, पोलीस व सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. देशभरातील सर्वच रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. नव्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये जागा शिल्लक नाही. मृतांची संख्या ६५० हून अधिक असू शकते. मात्र अधिकाऱ्यांनी रुग्णालयांना माहिती देण्यापसून रोखलं आहे. त्यामुळे मृतांची नेमकी संख्या समजू शकली नसल्याचं यूएनएचसीआरच्या (United Nations High Commissioner for Refugees) अहवालात म्हटलं आहे.

accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Muslims of Mumbra on streets to protect Hindus in Bangladesh
बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी मुंब्र्यातील मुस्लीम रस्त्यावर
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी

हे ही वाचा >>  ७२ तासात सहा हजार हिंदूंचे शिरकाण; १६ ऑगस्ट हा दिवस भारत-पाकिस्तान फाळणीला कसा ठरला कारणीभूत?

यूएनएचआरसीच्या अहवालात म्हटलंय की संरक्षण दलांनी बळाचा अधिक वापर केला आहे. ५ ऑगस्ट रोजी शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर देशभर लूट, दरोडे व अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या बातम्या येऊ लागल्या. दोन दिवसांनी काठ्या, लोखंडी रॉड, पाईप व दगड घेऊन आलेल्या मोठ्या जमावाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या आवामी लीग पार्टीची कार्यालये, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर हल्ले केले.

हे ही वाचा >> केंद्र सरकारकडून समितीची घोषणा, आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना; डॉक्टरांचा देशव्यापी संप

यूएनचं पथकं बांगलादेशला जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार

यूएनएचआरसीचे प्रमुख वोल्कर तुर्क यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “हिंसाचार करणारे, या हिंसाचारास कारणीभूत असलेले व ज्यांच्या बेजबाबदारपणामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला अशा लोकांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास व्हायला हवा.” तुर्क यांनी सांगितलं की यूएनएचसीआरचं एक पथक बांगलादेशला जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. हे पथक तिथे राहून हिंसाचाराच्या घटनांचा तपास करेल.

Story img Loader