बांगलादेशने आठ महिन्यांच्या कालावधीनंतर बुधवारी यूटय़ूबवरील बंदी उठविली. यूटय़ूबवरून इस्लामविरोधी फीत प्रसारित केल्यानंतर जगभर त्याविरुद्ध निदर्शने करण्यात आली होती. बांगलादेश दूरदळणवळण नियामक आयोगाचे प्रवक्ते सुनील कांती बोस यांनी बंदी उठविण्यात आल्याचे जाहीर केले. इंटरनॅशनल इंटरनेट गेटवेने (आयआयजी) ही लोकप्रिय सेवा ग्राहकांना पुरविण्याचे आदेश दिल्याने बांगलादेशने बंदी उठविली असून, आता नागरिकांना पुन्हा यूटय़ूब सेवेचा लाभ घेता येणार आहे, असे बोस यांनी सांगितले.

Story img Loader