Sheikh Hasina : बांगलादेशात जे अराजक माजलं त्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. बांगलादेशमध्ये आरक्षणाचा प्रश्न इतका पेटला की ५ ऑगस्टला अवघ्या ४५ मिनिटांत देश सोडावाला लागला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina ) या भारतात आल्या असून त्यांनी इथे आश्रय घेतला आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या कुटुंबातली १७ माणसं एकाचवेळी मारली गेली. आपण जाणून घेऊ त्यांची कौटुंबिक माहिती.

बांगलादेशात ४९ वर्षांपूर्वी सत्तापालट

बांगलादेशमध्ये ४९ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट १९७५ या दिवशी लष्कराने सत्ता पालटली होती. बांगालदेशचं पंतप्रधान निवासस्थान असलेल्या गणभवन या ठिकाणी रक्ताचे पाट वाहिले होते. कारण लष्कराने शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे वडील मुजीबुर्रहमान यांची हत्या केली. त्यावेळी ते बांगलादेशचे पंतप्रधान होते. त्यावेळी शेख हसीना यांची आई, त्यांचे तीन भाऊ, एक भाचा या सगळ्यांना ठार केलं. त्यांच्या कुटुंबातले १७ लोक या संघर्षात मारले गेले. त्यावेळी शेख हसीना (Sheikh Hasina) आणि त्यांची बहीण शेख रेहाना युरोपमध्ये होत्या. त्यामुळे या दोघी वाचल्या. शेख हसीना यांच्या कुटुंबाबत आपण जाणून घेऊ.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
gold from woman dead body s neck was stolen
मृत्यूनंतरही परवड थांबली नाही, पार्थिव रुग्णालयात नेताना महिलेच्या गळ्यातील गंठण चोरीला
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी
Hina Khan
कर्करोगाशी झुंज देणाऱ्या हीना खानने शेअर केले रुग्णालयातील फोटो; म्हणाली, “उपचाराच्या या ठिकाणी…”

शेख हसीना यांच्या आई वडिलांबाबत आणि भावंडांबाबतची माहिती

१) शेख मुजीबुर्रहमान : शेख मुजीबुर्रहमान हे शेख हसीना (Sheikh Hasina) यांचे वडील होते. बांगलादेशच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता. त्यांची हत्या करण्यात आली.

२) शेख फजीलतुन्नेसा मुजीब: शेख फजीलतुन्नेसा मुजीब या शेख हसीना (Sheikh Hasina) यांची आई होत्या. त्यांना बेगम मुजीब असं म्हटलं जायचं. त्यांचीही हत्या करण्यात आली.

३) शेख कमाल : शेख कमाल हा शेख हसीना (Sheikh Hasina) यांचा भाऊ होता, त्यालाही ठार करण्यात आलं

४) शेख जमाल : शेख जमाल बांगलादेश लष्करात लेफ्टनंट होते. त्यांनाही १९७५ मध्ये ठार करण्यात आलं.

५) शेख रेहाना : शेख रेहाना या शेख हसीना यांची लहान बहीण आहेत. जेव्हा कुटुंबातल्या १७ जणांची हत्या झाली तेव्हा शेख रेहाना २३ वर्षांच्या होत्या. तर शेख हसीना २८ वर्षांच्या होत्या.

६) शेख रसेल : शेख रसेल हे शेख हसीना यांचे सर्वात लहान भाऊ होते. त्यांचीही १९७५ मध्ये हत्या करण्यात आली.

हे पण वाचा- Sheikh Hasina : बांगलादेश सोडल्यानंतर शेख हसीना भारतातच का आल्या? काय आहे कारण?

शेख हसीना यांचे पती कोण होते?, त्यांना किती मुलं?

शेख हसीना यांनी १९६७ मध्ये एम. ए. वाजेद मियां यांच्याशी लग्न केलं होतं. ते अणू शास्त्रज्ञ होते. सिंगापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते त्यावेळी २००९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

साजिब वाजेद हे शेख हसीना यांचे पुत्र आहेत. सजिब वाजेद अमेरिकेत राहतात. त्यांनी बांगलादेश सरकारमध्ये सल्लागार म्हणूनही काम केलं आहे.

साइमा वाजेद : शेख हसीना यांची मुलगी साइमा वाजेद या मानसशास्त्रज्ञ आहेत. सध्या त्या WHO मध्ये दक्षिण पूर्व आशियाई विभागाच्या संचालक म्हणून कार्यरत आहेत.

Bangladesh Prime Minister Sheikh Hasina (1)
माध्यमातील माहितीनुसार शेख हसीना यांनी दि. ५ ऑगस्ट दुपारी बांगलादेशमधून दुपारी २.३० वाजता प्रस्थान केले. त्यांच्याबरोबर त्यांची लहान बहीण शेख रेहानाही होत्या.

रदवान सिद्दीकी : शेख हसीना यांचा मुलगा रदवान सिद्दीकी हे बँकॉकमध्ये वास्तव्य करतात. अवामी लीगचे प्रमुख होते.

ट्युलिप सिद्दीकी या रेहाना यांची मुलगी आहेत. त्या ब्रिटिश खासदार आहेत आणि सामाजिक कार्य करतात.

शेख हसीना या १९७५ मध्ये बांगलादेशात नव्हत्या त्यामुळे त्या वाचल्या. आता त्यांच्या देशात अराजक माजल्याने त्यांना देश सोडावा लागला. त्या सलग चौथ्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या होत्या.

Story img Loader