Khaleda Zia: बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलनाने राजकीय सत्तांतर घडवून आणल्यापासून माजी पंतप्रधान शेख हसीना या भारताच्या आश्रयाला आहेत. इथून त्या युरोप किंवा अमेरिकेत आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. शेख हसीना यांच्या अवाली लीग या राजकीय पक्षाच्या कट्टर विरोधक खलेदा झिया यांचा राजकीय पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने (BNP) शेख हसीना यांना भारताने आश्रय दिल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे, तसेच भारताला इशारा दिला आहे.

खलेदा झिया यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते गयेश्वर रॉय यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटले, “बांग्लादेश आणि भारत यांच्यातील परस्पर सहकार्याचे बीएनपी पक्ष समर्थन करतो. पण जर तुम्ही आमच्या शत्रूला मदत करत असाल तर या परस्पर सहकार्याचा आदर करणे कठीण होईल.” तसेच शेख हसीना यांना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भारताने पाठिंबा दिलेला आहे, याबद्दलही त्यांना चिंता वाटत असल्याचे रॉय म्हणाले.

What Ravneet Bittu Said About Rahul Gandhi?
Rahul Gandhi : “राहुल गांधी देशातले एक नंबरचे दहशतवादी, त्यांच्यावर बक्षीस..” केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचं वक्तव्य
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
Loksatta anvyarth Discussion between Prime Minister Narendra Modi and US President Joe Biden on Bangladesh issue
अन्वयार्थ: गोंधळ, गोंधळी यांना थारा नकोच!
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार

हे वाचा >> अग्रलेख : ‘शहाणा’ मोहम्मद!

“भारत सध्या शेख हसीना यांची जबाबदारी उचलत आहे. भारत आणि बांगलादेशमधील लोकांचे एकमेकांशी वैर नाही. पण भारताने संपूर्ण देशापेक्षा एकाच पक्षाला (अवाली लीग) उचलून धरणे योग्य आहे का?”, असाही प्रश्न गयेश्वर रॉय यांनी उपस्थित केला आहे.

शेख हसीना कुठे जाणार?

सोमवारी (५ ऑगस्ट) शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला. पण पुढे त्या काय करणार? हे सध्या अस्पष्ट आहे. एकतर त्या पाश्चात्य देशांत आश्रय मागू शकतात किंवा भारतातच राहू शकतात किंवा पुन्हा बांगलादेशमध्ये परतू शकतात.

दरम्यान शेख हसीना यांचा मुलगा जीब वाजेद जॉयने भारत सरकारचे आभार मानले आहेत. माझ्या आईला संरक्षण दिल्याबद्दल मी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करतो. तसेच बांगलादेशात पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा, असेही आवाहन जॉय यांनी केले आहे. तसेच यूके आणि यूएसने शेख हसीना यांचा व्हिसा नाकारला असल्याचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आहे.

हे ही वाचा >> बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यासमोर असतील ‘ही’ आव्हाने

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून ८ ऑगस्ट रोजी शपथ घेतली. मोहम्मद युनूस यांच्यासह एकूण १५ सदस्यांनी शपथ घेतली आहे. शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर आता बांगलादेशमध्ये शांततेच्या वातावरणात नवीन सरकार स्थापन करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे.

मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स अकाउंटवर (ट्विटर) पोस्ट करत मोहम्मद युनूस यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करून बांगलादेश परत सामान्य स्थितीत येण्याची आम्ही आशा करतो”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा >> शेख हसीना भारतात किती काळ राहणार? ब्रिटनने आश्रय देण्यास नकार दिला तर काय होईल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“प्रोफेसर मुहम्मद युनूस यांनी नवीन जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांना माझ्या शुभेच्छा. हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करून, बांगलादेश सामान्य स्थितीत लवकर परत येण्याची आम्ही आशा करतो. शांतता, सुरक्षा, विकासासाठी आणि लोकांच्या सामायिक आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत बांगलादेशसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.