बांगलादेशमध्ये पुढील जानेवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण असल्याने निवडणुकीच्या कालावधीत सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान शेख हसीना यांनी ठेवला असल्याने त्याबाबत विरोधी पक्ष कोणती भूमिका घेतो त्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीच्या कालावधीत आपण सर्वपक्षीय सरकार स्थापन करू या, असा आपला विरोधी पक्षापुढे प्रस्ताव आहे, असे शेख हसीना यांनी आपल्या २२ मिनिटांच्या भाषणांत स्पष्ट केले. विरोधी पक्षनेत्या खलिदा झिया यांनी आपल्या प्रस्तावाला अनुकूल प्रतिसाद द्यावा, अशी विनंतीही हसीना यांनी केली आहे. खलिदा झिया आपला प्रस्ताव स्वीकारतील, अशी अपेक्षाही हसीना यांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक पद्धतीवरून सत्तारूढ अवामी लीग आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीमधील (बीएनपी) मतभेद विकोपाला गेले असल्याने बांगलादेशात राजकीय हिंसाचाराचा उद्रेक होईल, अशी भीती व्यक्त केली जात असल्याने हसीना यांनी सदर प्रस्ताव मांडला आहे. दरम्यान, बिगर पक्षीय काळजीवाहू सरकार स्थापन करून निवडणुका पार पाडल्या जाव्यात, या मागणीसाठी बीएनपीने २५ ऑक्टोबर रोजी ढाक्यात मोठा मेळावा आयोजित केला आहे.

आंध्र प्रदेशच्या प्रस्तावित विभाजनाच्या विरोधात ऑक्टोबर महिन्यांच्या पूर्वार्धात येथे हिंसाचाराचा उद्रेक