पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शनिवारी सकाळी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यासाठी ढाका येथे आगमन झाले. यावेळी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी राजशिष्टाचाराला फाटा देत ढाका विमानतळावर नरेंद्र मोदींचे स्वागत केले. मोदींच्या स्वागतासाठी ढाका शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून संपूर्ण शहरात मोदींच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. बांगलादेशच्या प्रसारमाध्यमांनीही मोदींच्या दौऱ्याची दखल घेताना हा दौरा ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदी यांनीही बांगलादेशमध्ये आल्यानंतर ट्विटरच्या माध्यमातून बांगलादेशच्या लोकांना आपण भारतातून सदिच्छा घेऊन आल्याचे सांगितले. ढाका शहरात आल्यानंतर मोदींनी येथील राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट दिली. दरम्यान, या दौऱ्यात पंतप्रधानांबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही असणार आहेत.
या दौऱ्यामध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून भिजत पडलेल्या प्रश्नावर अखेर ४४ वर्षांनी तोडगा निघण्याची शक्यता आहे. यामध्ये दोन देशांदरम्यान असलेल्या सीमावादाचा प्रश्न निकालात निघण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा