Bangladesh Power Supply Alert : बांगलादेशाकडे अदानी पॉवरचे वीज बिल मोठ्या प्रमाणात थकले आहे. त्यामुळे हे थकीत वीज बिल भरण्यासाठी अदानी पॉवरकडून बांगलादेशाला चार दिवसांची मुदत देण्यात आली होती. थकीत वीज बिलाचे पैसे न दिल्यास अदानी पॉवर बांगलादेशाची वीज खंडित करण्याचा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे. बांगलादेशाला थकीत वीज बिल भरण्यासाठी चार दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.

दरम्यान, अदानी पॉवर झारखंड लिमिटेड या कंपनीचे तब्बल ८४.६ दशलक्ष डॉलर्सचे बिल थकल्यामुळे बांगलादेशाला करण्यात येणारा वीजपुरवठा निम्म्याने कमी केला होता. एवढेच नव्हे तर ३० नोव्हेंबरपर्यंत थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा इशारा कंपनीकडून देण्यात आला होता. मात्र, अदानी पॉवर झारखंड लिमिटेड कंपनीच्या इशाऱ्यानंतर बांगलादेशाने तातडीने पावलं उचलत हे थकीत वीज बिल भरण्यासाठी पावलं उचलली आहेत. यासंदर्भातील वृत्त मनी कंट्रोलने दिलं आहे.

Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Sakshi Malik on Brij Bhushan Sharan Singh sexual harassment
Sakshi Malik: “ब्रिजभूषण सिंह यांनी त्यांच्या बेडवर मला…”, लैंगिक अत्याचार प्रकरणी साक्षी मलिकचा धक्कादायक दावा
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ‘जे बाळासाहेबांचे झाले नाहीत, ते राज ठाकरेंचे काय होणार?’, राजू पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Sharad Pawar on Jarange Patil
Sharad Pawar : मनोज जरांगेंनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “मला आनंद, कारण…”
Rashmi SHukla on Sharad Pawar
Rashmi Shukla Transferred : रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची प्रतिक्रया, म्हणाले, “आता त्या…”
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Khar Gymkhana Cancel Cricketer Jemimah Rodrigues Membership
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जचं खार जिमखाना सदस्यत्व रद्द; वडिलांतर्फे आयोजित धार्मिक कार्यक्रमांमुळे कारवाई

हेही वाचा : Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या अल्मोडा दरीत बस कोसळून २३ प्रवाशांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी

अदानी पॉवरचे बांगलादेशाकडे मोठ्या प्रमाणात वीज बिल थकल्यानंतर अदानी पॉवरकडून बांगलादेशावर दबाव आणण्यात सुरुवात करण्यात आली आहे. यासंदर्भात बांगलादेशाला तातडीने हे थकीत वीज बिल लवकरात लवकर भरण्यासाठी सांगत चार दिवांसाची मुदत दिली होती. तसेच बांगलादेशाला पुरवण्यात येणाऱ्या एकूण वीजपुरवठ्यात निम्म्याने घट केली होती. त्यामुळे लोकांना देखील मोठ्या समस्याला समोरं जावं लागत असल्याने आता बांगलादेश सरकारकडून तातडीने हे बिल भरण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

बांगलादेश सध्या वीजेच्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे याचे अनेक दुष्परिणाम बांगलादेशाच्या अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतात. भारतातून १,६०० मेगावॅट गोड्डा प्लांटमधून ढाक्याला वीज निर्यात करणाऱ्या अदानी पॉवरने वीजनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कोळशाच्या आयातीतील आव्हानांना तोंड देत थकबाकी मिळविण्याची अंतिम मुदत बांगलादेशाला निश्चित केली आहे. गौतम अदानी यांच्या मालकीच्या कंपनीने या महिन्यात बांगलादेशाला करण्यात येणारा वीजपुरवठा सुमारे १,४०० मेगावॅटवरून ७०० ते ८०० मेगावॅटपर्यंत कमी केला असल्याची माहिती बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, गुरुवारी रात्रीपासून वीज पुरवठ्यात कपात करण्यात आल्यामुळे बांगलादेशला एका रात्रीत १,६०० मेगावॅटपेक्षा जास्त वीजटंचाईचा सामना करावा लागला आहे. १,४९६ मेगावॅटचा बांगलादेशी प्लांट आता ७०० मेगावॅटवर कार्यरत आहे. त्यामुळे सध्या बांगलादेशाला वीज कपातीचा समाना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशासमोर हे संकट उभं ठाकलं आहे. दरम्यान, शेख हसीना यांचं सरकार गेल्यानंतर बांगलादेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही बांगलादेशाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागत असल्याचं दिसून येत आहे.