ढाका : बांगलादेशमध्ये या वर्षाच्या अखेरीस, डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणूक घेण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती तेथील निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. गेल्या आठवड्यात देशव्यापी निदर्शनांदरम्यान झालेल्या मोडतोडीनंतर हंगामी सरकारने निवडणूक प्रस्तावाला मान्यता दिली.

हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी सोमवारीच माजी पंतप्रधान आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) खालिदा झिया यांना डिसेंबरमध्ये निवडणूक घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयुक्त अबुल फजल मोहम्मद सनाउल्लाह यांनी त्यासाठी तयारी सुरू असल्याचा खुलासा केला.

Story img Loader