Bangladesh Protests impacts India BSF on high alert : बांगलादेशमधील राजकीय वातावरण गेल्या महिनाभरापासून अस्थिर आहे. जनतेचा वाढता रोष आणि हिंसाचार पाहून शेख हसीना यांनी आज (५ ऑगस्ट) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला, पाठोपाठ त्यांनी बांगलादेशमधून पलायन केलं आहे. त्या देश सोडून कुठे गेल्या आहेत हे अद्याप माहिती नसलं तरी त्या आश्रयासाठी भारतात येत असल्याचा दावा काही वृत्तसंस्थांनी केला आहे. सरकारी नोकऱ्यांमध्ये देण्यात आलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हिंसाचार थेट बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानापर्यंत पोहोचला. त्यामुळे त्यांना देशाचं प्रमुखपद सोडावं लागलं आहे. तसेच देशातून पलायन करावं लागलं आहे. भारताच्या शेजारील देशात घडत असलेल्या सर्व घटना पाहता हा देश पुन्हा एकदा अस्थिरतेच्या वाटेवर असल्याचं दिसून येत आहे. तसेच बांगलादेशमधील घडामोडींनंतर भारतातही मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. केंद्र सरकारने भारत बांगलादेश सीमेवर अनेक सैन्य तुकड्या पाठवल्या आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा