बांगलादेशात विरोधी पक्षनेत्या बेगम खलिदा झिया यांनी उद्या (रविवारी) ७२ तासांच्या देशव्यापी बंदची हाक दिली असून अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील वीज पुरवठाच बंद केला आहे.
माजी पंतप्रधान झिया यांच्या एका सहकाऱ्याने सांगितले की, पहाटे सरकारने त्यांच्या घरातील वीज पुरवठा बंद केला.  बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने सरकारविरोधात देशव्यापी बंदची हाक दिली असून नेमकी त्याच दिवशी तेथे माध्यमिक शालांत परीक्षा होत आहे. १५ लाख मुले त्यात सहभागी होत असून त्यांना मात्र यामुळे त्रास होणार आहे.