आपली विजेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी बांगलादेशने भारताकडून मिळणाऱ्या विजेचा कोटा वाढवून मिळावा,अशी मागणी केली आहे. भारतानेआपल्याला आणखी ५०० मेगाव्ॉट विजेचा पुरवठा करावा,अशी विनंती बांगलादेशने केल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशचे परराष्ट्र सचिव सहिदुल हक यांनी भारताच्या ऊर्जा मंत्रालयाला अतिरिक्त वीज पुरवण्याबाबत विनंती केल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. बांगलादेशच्या प्रस्तावाबाबत अभ्यास करण्यात येत असून आताच याबाबत ठोस सांगणे योग्य होणार नाही,असेही सुत्रांनी स्पष्ट केले.
२०१२ मध्ये भारताने पूर्वेकडील विद्युत केंद्रातून बांगलादेशला ५०० मेगाव्ॉट विजेचा पुरवठा करण्याचे मान्य केले होते. भारत- बांगलादेश यांच्यात झालेल्या करारानुसार बांगलादेश भारत सरकारकडून २५० मेगाव्ॉट तर खासजी कंपन्यांकडून २५० मेगाव्ॉट वीज आयात करीत आहे.
दरम्यान, पाकिस्ताननेदेखील भारताकडून विजेची मागणी केली आहे. याबाबत पाकिस्तानच्या मंत्रीमंडळाने भारताकडून वीज घेण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे.

Story img Loader