बांगलादेशात उसळलेल्या तीव्र हिंसाचाराबद्दल काळजी व्यक्त करीत, अमेरिकेने बांगलादेश शासनाला त्यांच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्याचे आवाहन केले आह़े  तसेच नागरिकांना त्यांच्या भावना शांततेने व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे, असेही अमेरिकेने म्हटले आह़े
धर्मनिंदेच्या विरोधात अधिक कडक कायदा असावा, या मागणीसाठी दंगे करणारे इस्लामी कट्टरतावादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षांत अनेक जणांना आपले प्राण गमावावे लागले होत़े  या हिंसाचारासोबत झालेल्या संप-हरताळ आदींमुळे गेले काही आठवडय़ांपासून ढाक्यामधील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते, असे परराष्ट्र प्रवक्ते पेट्रिक वेन्ट्रेल यांनी सांगितल़े  अमेरिकेच्या ढाकामधील दूतावासाकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आह़े  तसेच सर्वपक्षीयांमधील चर्चेला प्रोत्साहन देण्यात येत आह़े  शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आह़े  आणि आमचा पूर्ण विश्वास आहे की, हिंसा हे कोणत्याही समस्येचे उत्तर होऊ शकत नाही, असेही ते पुढे म्हणाल़े

Story img Loader