Bangladesh Violence Update Prisoners Escape from Jail : माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पलायनानंतरही बांगलादेशमधील हिंसाचार जारी आहे. राजधानी ढाकामधील परिस्थिती खूपच चिघळली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. दरम्यान, आक्रमक जमावाने उत्तर बांगलादेशमधील शेरपूर जिल्ह्यातील एका तुरुंगावर हल्ला करून तिथल्या ५०० हून अधिक कैद्यांना मुक्त केलं आहे. यामध्ये अनेक क्रूर दहशतवाद्यांच्या समावेश आहे. प्रामुख्याने जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश या दहशतवादी संघटनेतील दहशतवादी तुरुंगातून फरार झाले आहेत. हे दहशतवादी एखादी विघातक घटना घडवून आणू शकतात. त्यामुळे बांगलादेशी लष्कराचे धाबे दणाणले आहेत.

भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेले काही दहशतवादी देखील या तुरुंगात शिक्षा भोगत होते, ते देखील फरार झाले असल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. त्यामुळे भारत सरकारने बांगलादेशबरोबरच्या सर्व सीमा सुरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. अशातच बांगलादेशबरोबरच्या अनेक सीमा सील केल्या आहेत.

Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
account wise inquiry started against clerk in case of corruption in Jijamata Hospital of Municipal Corporation in Pimpri
पिंपरी : जिजामाता रुग्णालयातील रकमेचा अपहार; लिपिकाची खातेनिहाय चौकशी
Six Bangladeshi women arrested from Bhiwandi
Bangladeshi women arrested : भिवंडीतून सहा बांगलादेशी महिलांना अटक
India Bangladesh relations, Foreign Secretary talks
भारत-बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त
sarva jat dharm ekta manch
बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सर्व जाती-धर्म एकता मंचची मागणी
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Image of police
Sambhal Violence : संभलमधील पोलिसांच्या कारवाईचे पत्नीने केले कौतुक, संतापलेल्या पतीने दिला ‘तिहेरी तलाक’ 

बांगलादेशात गेल्या महिन्यापासून सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थी आंदोलन सुरू होते. शनिवारी आंदोलन अधिक तीव्र होऊन त्याला हिंसक वळण लागलं. हे आंदोलन चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देशाबाहेर पलायन केलं. त्यामुळे बांगलादेशमधील त्यांची १५ वर्षांची राजवट अचानक संपुष्टात आली असून लष्करप्रमुखांनी लवकरच हंगामी सरकारची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. सध्या बांगलादेशी लष्कराने देशाची कमान आपल्या हाती घेतली असून ते देशात शांतता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.

शेख हसीना यांचं बांगलादेशमधून पलायन

रविवारी (४ ऑगस्ट) सत्ताधारी आवामी लीगचे कार्यकर्ते व आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसाचारात १४ पोलिसांसह १०० हून अधिक लोक मारले गेले. काही माध्यमांनी मृतांचा आकडा ३०० हून अधिक असल्याचा दावा केला आहे. या दंगलींनंतर सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी जाहीर केली होती. आंदोलन अधिक हिंसक झाल्यानंतर शेख हसीना यांनी सोमवारी राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांत बांगलादेशातून पलायन करत भारत गाठला. भारत सरकारची मदत घेत त्या लंडनला जाणार असल्याचा दावा अनेक वृत्तसंस्थांनी केला आहे.

हे ही वाचा >> Sheikh Hasina : “शेख हसीना बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत”, पुत्र साजिब वाजेद यांचं मोठं वक्तव्य; पुढील योजना सांगत म्हणाले…

शेख हसीना बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाही?

दरम्यान, शेख हसीना यांचे पुत्र साजिब अहमद वाजेद जॉय यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. साजिब अहमद वाजेद यांनी म्हणाले, की आई (शेख हसीना) आता कदाचित बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाही.

Story img Loader