Farooq Abdullah on Violence against Hindus in Bangladesh : बांगलादेशमधील सत्तांतरानंतर तिथल्या अल्पसंख्याकांवरील अत्याच्याराच्या, त्यांच्याविरोधात होत असलेल्या हिंसाचाराच्या बातम्या समोर येत आहेत. आंतरराष्ट्रीय माध्यमं देखील सातत्याने त्याची दखल घेत आहेत. भारतातील नेते तिथे होत असलेल्या घटनांचा निषेध करताना दिसतायत. तर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांगलादेशमधील हिंदूंची स्थिती नाजूक असल्याचं म्हणत तिथे शांतीसेना पाठवण्याची मागणी केली आहे. मात्र, बॅनर्जी यांचे इंडिया आघाडीतील सहकारी, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख तथा जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी फारुक अब्दुल्ला यांना बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांविरोधात होत असलेल्या हिंसाचाराबद्दल प्रतिक्रिया विचारली असता फारुक अब्दुल्ला म्हणाले, “मी काही ऐकलं नाही, मला काही माहिती नाही”. अब्दुल्ला यांच्या या वक्तव्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.
फारुक अब्दुल्ला म्हणाले, “मला तिथलं काही माहिती नाही, मी काहीही ऐकलेलं नाही. त्यामुळे मी त्यावर कोणतीही टिप्पणी करणार नाही. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारा. तिथल्या स्थितीबद्दल तुम्ही मोदींना विचारायला हवं”.
हे ही वाचा >> Actor Vijay on Ambedkar: “आंबेडकरांचीही मान आज शरमेने खाली झुकली असती…”, तमिळ अभिनेता विजयचं मोठं विधान
बांगलादेशात शांतिसेना पाठवावी! ममता बॅनर्जी यांची मागणी
“बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडी पाहता केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे (यूएन) बांगलादेशात शांतिसेना (पीसकीपिंग मिशन) तैनात करण्याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा”, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली.
हे ही वाचा >> Syria Crisis: ‘लवकरात लवकर तिथून निघा’ सीरियामधील भारतीय नागरिकांना परराष्ट्र मंत्रालयाचे आवाहन; कारण काय?
म्हणून मला बोलावं लागतंय : ममता बॅनर्जी
“बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडींवर भारताची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत मांडावी”, अशीही मागणी ममता बॅनर्जी यांनी केली. बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला संबोधित करताना ही मागणी केली. ‘‘भारत व बांगलादेशच्या द्विस्तरावरील संबंधांवर बोलणं माझ्या अधिकाराबाहेरचं आहे. मात्र, बांगलादेशमधील घडामोडी पाहता आणि पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांचे बांगलादेशमधील अनुभव सांगितल्यानंतर, बांगलादेशातून भारतात येणाऱ्या अनेकांना अटक झालेल्या घटनांनंतर, तसेच ‘इस्कॉन’च्या प्रतिनिधींशी बोलल्यानंतर, मला विधानसभेत यावर बोलणं भाग पडलं आहे,’’ असंही बॅनर्जी म्हणाल्या.
बांगलादेशमध्ये आतापर्यंत अनेक हिंदू सन्यांशांना देखील अटक करण्यात आली आहे. तिथल्या अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराविरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना तिथल्या सरकारने तुरुंगात डांबलं आहे.
y