बांगलादेशातील छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मीता नूर सोमवारी तिच्या निवासस्थानी संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळली. ढाक्यातील बंगल्यामध्ये मीताचा मृतदेह हॉलमधील पंख्याला लटकलेला पोलिसांना आढळला.
मीताची हत्या झाली की तिने आत्महत्या केली, याचा शोध अद्याप लागलेला नाही. पोलिसांनी हा गूढ मृत्यू असल्याचे म्हटले आहे. मीताचा मृतदेह पंख्याला लटकलेला बघून तिच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलावून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मीता आपल्या मुलासोबत बंगल्यामध्ये राहात होती, असे बांगलादेशातील एका खासगी वाहिनीने म्हटले आहे. आईने असे का केले, हे मला सांगता येणार नाही, असे मीताचा मुलगा शेहजाद नूर याने खासगी वाहिनीला सांगितले.

Story img Loader