Bangladeshi Youtuber Viral Claim: गेल्या अनेक वर्षांपासून भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाल्याचं दिसून आलं आहे. हा मुद्दा सातत्याने राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असतानाच इंटरनेटवर सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये खळबळ उडाली आहे. हा व्हिडीओ खरंतर वर्षभरापूर्वीचा आहे. पण त्यात करण्यात आलेल्या दाव्यांमुळे सोशल मीडियावर नेटिझन्सकडून संताप व्यक्त केला जात आहे. भारतातील काही युजर्सनं या व्हिडीओवर व संबंधित यूट्यूबरवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘इंडिया टुडे एनई’नं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमका प्रकार काय आहे?

एक व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा एक यूट्यूब व्हिडीओ असून यातील यूट्यूबर बांगलादेशी असल्याचं सांगितलं जात आहे. या यूट्यूबरनं व्हिडीओमध्ये बांगलादेशमधून भारतात कोणताही पासपोर्ट किंवा व्हिसाशिवाय कसं जायचं, यासंदर्भात दावे केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या यूट्यूबरनं पूर्ण व्हिडीओमध्ये दाखवलेला मार्ग तोच असल्याचा दावा केला आहे. शिवाय त्यात अनेक ठिकाणी जमिनीखालच्या पाईपलाईनमधूनही हा यूट्यूबर व त्याचे सहकारी जाताना दिसत आहेत.

यूट्यूबरच्या व्हिडीओवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नेटिझन्स करत आहेत. (फोटो – सोशल मीडिया स्क्रीनशॉट)

विशेष म्हणजे संपूर्ण व्हिडीओमध्ये हा यूट्यूबर या मार्गावरील भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांचा निसर्गरम्य, सुंदर उल्लेख करून त्यांचं वर्णन करत आहे. हा मार्ग बांगलादेशच्या सुनामगंज जिल्ह्यातल्या एका गावातून जात असल्याचा दावा या यूट्यूबरनं व्हिडीओमध्ये केला आहे.

CCTV: बंगळुरूतील ‘त्या’ धक्कादायक घटनेचं सीसीटीव्ही फूटेज व्हायरल; पीजी हॉस्टेलमध्ये घुसून २२ वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या!

पासपोर्ट, व्हिसाशिवाय भारतात प्रवेश

दरम्यान, या यूट्यूबरनं आपल्या व्हिडीओमध्ये बांगलादेशातून भारतात कोणत्याही पासपोर्ट वा व्हिसाशिवाय छुप्या मार्गाने जाणं शक्य असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे देशांतर्गत सीमा अवैधरीत्या ओलांडून आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केल्याप्रकरणी या यूट्यूबरवर कारवाई करण्याची मागणी आता नेटिझन्स करू लागले आहेत. तसेच, यानिमित्ताने पुन्हा एकदा भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.

या यूट्यूबरवर कारवाईची मागणी केली जात आहे. (सोशल व्हायरल व्हिडीओतील स्क्रीनशॉट)

सोशल मीडियावर अनेक युजर्सकडून या प्रकाराचा निषेध केला जात आहे. तसेच, काही युजर्सनं केंद्र सरकारला तातडीने या संपूर्ण प्रकरणावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.