जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्या्ंकडून कश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कश्मीरच्या कुलगामध्ये बँकेत घुसून व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. विजय कुमार असे त्या व्यवस्थापकाचे नाव आहे. या हल्ल्यात विजय कुमार यांचा मृत्यू झाला. काही दिवासांपूर्वीच काश्मिरी पंडित शिक्षिका रजनी बाला यांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एका शिक्षिकेची करण्यात आली होती हत्या

विजय कुमार हे मुळचे राजस्थानचे रहिवासी होते. कुलगाममधील अरे मोहनपोरा गावात एल्लाकी देहाती बँकेच्या (ईडीबी) शाखेत ते व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. अलीकडेच मंगळवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या घालून हत्या केली होती. बाला या काश्मिरी पंडित होत्या. तसेच बडगाममध्ये तहसील कार्यालयात घसून सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.मंगळवारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या घालून हत्या केली होती. बाला या काश्मिरी पंडित होत्या. तसेच बडगाममध्ये तहसील कार्यालयात घसून सरकारी कर्मचारी राहुल भट्ट यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

काश्मीरमध्ये पंडित सुरक्षित नसल्याचा आरोप
भट्ट यांच्या हत्येनंतर काश्मिरी पंडिंताकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. ठिकठिकाणी निदर्शनेही करण्यात आली होती दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडितांना लक्ष्य केले जात असून कश्मीरमध्ये आम्ही सुरक्षित नसल्याचा आरोप काश्मिरी पंडितांनी केला होता. तसेच आम्हाला सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करावे अशी मागणी काश्मीरी पंडितांकडून करण्यात आली आहे.