उद्योगपती विजय मल्ल्या यांनी बँक ऑफ बडोदाकडून घेतलेल्या कर्जाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे कर्ज घेताना मल्ल्या यांनी कागदपत्रांवर हमीदार म्हणून उत्तरप्रदेशातील एका सामान्य शेतकऱ्यांचे नाव लिहले आहे. बँक ऑफ बडोदाच्या माहितीनुसार, पिलीभीत येथील अवघी आठ एकर शेती असलेले मनमोहन सिंग यांचा मल्ल्या यांच्या कर्जासाठीचे हमीदार म्हणून उल्लेख आहे. मात्र, आता मल्ल्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमुळे मनमोहन सिंग यांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. त्यामुळे मनमोहन सिंग यांना सरकारी योजनांतर्गत बँक खात्यांद्वारे मिळणारी अनुदाने मिळणे मुश्किल झाले आहे. मुंबईतील विभागीय कार्यालयाच्या आदेशावरून ही खाती गोठविण्यात आली आहेत. मात्र, मी आत्तापर्यंत विजय मल्ल्याला कधीच भेटलो नसल्याचा दावा मनमोहन यांनी केला आहे. मल्ल्याला कधी संपर्कही केला नाही आणि ओळखतही नाही. एवढचं काय तर मल्ल्याला मी कधी बघितलेही नाही, असे मनमोहन यांनी सांगितले. माझ्या एका खात्यात चार हजार आणि दुसऱ्या खात्यात १,२१७ इतकी रक्कम आहे. यामधून बँक कोटी रूपयांचे कर्ज वसूल कसे करणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा