bank official arrested for stealig money while counting cash offerings at Vrindavan temple : उत्तर प्रदेशमधील वृंदावन शहरातील ठाकूर बांके बिहारी महाराज मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हे दान दिलेले पैसे मोजताना ते चोरणाऱ्या कॅनरा बँकेच्या एका अधिकार्याला पोलिसांनी अटक केली आहे.
वृदांवन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरा येथील डॅम्पियर नगर शाखेत काम करणाऱ्या अभिनव सक्सेनाने गेल्या तीन दिवसांत पैसे चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याच्याकडून ९ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली आहे. बँकेने तात्काळ त्या अधिकाऱ्याला निलंबित केले आणि त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू केली. त्याने २०२० पासून चार वर्षे बँकेच्या वृंदावन शाखेतही काम केले होते.
ही घटना उजेडात आल्यानंतर बँकेने तात्काळ या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच त्याच्याविरोधात विभागाअंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. २०२० पासून त्याने चार वर्षे बँकेच्या वृंदावन शाखेतही काम केले होते.
मंदिर समितीच्या सदस्याने दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मंदिर परिसरात १६ दान पेट्या आहेत ज्याच्या माध्यमातून भाविक रोख पैशांच्या रुपात दान करतात. या पेट्यांमध्ये जमा झालेले पैसे दर महिन्याला एक किंवा दोनदा मोजले जातात आणि मंदिर ट्रस्टच्या बँक खात्यात जमा केले जातात.
“ज्या बँकांमध्ये आमची खाती आहेत त्यांना आम्ही पत्र पाठवतो, ज्यामध्ये पैसे मोजण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची मागणी केली जाते. आम्ही चार दिवसांपूर्वी वृंदावनमधील विद्यापीठ क्रॉसिंग येथील कॅनरा बँकेच्या शाखेत पत्र पाठवले होते आणि बँकेने अभिनव आणि दुसर्या एका कर्मचाऱ्याला कामासाठी पाठवले होते. शनिवारी संध्याकाळी लाइव्ह सीसीटीव्ही फुटेजवर नजर ठेवणाऱ्या एका ट्रस्ट कर्मचाऱ्याने अभिनवला नोटा मोजताना पैसे चोरी करताना पाहिले आणि याबद्दल आम्हाला सांगितले ,” अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी जगमोहन यांनी दिली.
आम्ही धावत घटनास्थळी पोहचलो आणि आरोपीच्या बॅगेची आणि त्याने घातलेल्या कपड्यांची तपासणी केली. आम्हाला शनिवारी संध्याकाळी जवळपास १.२६ लाख रुपये त्याच्या कपड्यातून सापडले. त्यानंतर त्याच्या मथूरा येथील पोस्टिंगच्या ठिकाणी बॅगेतून ८ लाखाहून अधिक रक्कम सापडली, असे वृंदावन पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर प्रशांत कपिल यांनी सीांगितले.
पोलिसांनी सांगितले की सक्सेना हा रामपूरचा रहिवासी आहे आणि त्याचे गेल्या वर्षीच चार्टेड अकाउंटंट महिलेशी लग्न झाले आहे. आम्ही या चोरीच्या घटनेत इतर कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यासाठी अधिकची चौकशी करत आहोत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.