तब्बल ५२ हजार कोटींच्या कृषी कर्जमाफीच्या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींकडे लक्ष वेधतानाच या योजनेचा बँका व वित्तीय संस्थांनीही गैरफायदा घेतल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत.कृषी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या बँकांनी सरकारकडून अकारण दंड, व्याज, विधीविषयक शुल्क तसेच अन्य शुल्कांची वसुली केल्याबद्दलही कॅगने ताशेरे ओढले आहेत. बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देऊन पावती घ्यायला हवी होती, असेही कॅगने निदर्शनास आणून दिले आहे.
एका खासगी शेडय़ूल्ड वाणिज्य बँकेद्वारे सूक्ष्म वित्त संस्थांना १६४.६० कोटींचा लाभ पोहोचवून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. ८.६४ कोटींच्या कर्जमाफीच्या २,८२४ प्रकरणांमध्ये खाडाखोड आणि दस्तावेज बदलण्याचे प्रकार घडले आहेत. ४,८२६ प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना नियमांनुसार लाभ मिळाले नाहीत. ३,२६२ प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना १३.३५ कोटींचा अनावश्यक लाभ पोहोचविण्यात आला. १,५९१ प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना १.९१ कोटींच्या हक्काच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचे कॅगने या अहवालात म्हटले आहे. ९०,५७६ प्रकरणांपैकी २०,२१६ म्हणजे २२.३२ टक्के प्रकरणांमध्ये खाडाखोड व चुका झाल्याचे कॅगने अहवालात नमूद केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा