तरुण तेजपाल यांना अटक झाल्यामुळे एकीकडे संकटात सापडलेल्या तेहलका नियतकालिकामागे लागलेली शुक्लकाष्ठे संपण्याची चिन्हे नाहीत. ‘तेहलका’ची मालकी असलेल्या अनंत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर संपत्ती कमी आणि देणी जास्त अशी अवस्था आली आहे. त्याशिवाय या कंपनीमध्ये अंतर्गत हिशेब तपासनीस आणि लेखापरीक्षकांचा अभाव, सेवा कराचा भरणा न करणे अशा अनेक अनियमितता कंपनी व्यवहार मंत्रालयास आढळल्या आहेत. त्यामुळे बाह्य़ लेखापरीक्षकांनीही कंपनीच्या आर्थिक व्यवहारांवर ‘लाल शेरे’ मारले आहेत. याबद्दल अधिकृतपणे कोणतेही भाष्य करण्यास मंत्रालयाने नकार दिला असला तरीही अनंत मीडिया प्रा. लि. कंपनीची चौकशी करायची किंवा कसे, याबाबत मंत्रालय सध्या गांभीर्याने विचार करीत आहे.
सहा दिवसांची कोठडी
सहकारी पत्रकार महिलेशी लैंगिक गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोपी असलेले ‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांचे जाबजबाब सुरू केले आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शमा जोशी यांनी तेजपाल यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी दिली, मात्र पोलिसांनी १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
सरकारी वकील फ्रान्सिस तवेरा यांनी सांगितले, की तेजपाल यांनी केलेला गुन्हा पाहता त्यांचे जाबजबाब घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची गरज आहे. तेजपाल यांना शनिवारी रात्री नऊ वाजता अटक करण्यात आली. दरम्यान, शनिवारची रात्र तेजपाल यांना तीन गुन्हेगारांसह पोलीस कोठडीत काढावी लागली. त्यातील दोघे खुनाच्या गुन्हय़ातील आरोपी आहेत. मध्यरात्री बारा वाजता त्यांची गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अनिवार्य वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.
तेहलका बुडणार?
तरुण तेजपाल यांना अटक झाल्यामुळे एकीकडे संकटात सापडलेल्या तेहलका नियतकालिकामागे लागलेली शुक्लकाष्ठे संपण्याची चिन्हे नाहीत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-12-2013 at 02:12 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bankrupt tehelka may close