आसाराम बापू यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात अज्ञात हल्लेखोरांनी शहाजानपूर जिल्ह्य़ात एका साक्षीदारावर गोळ्या झाडल्या. कृपाळ सिंह (३५) यांच्यावर पुवाया भागात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी शुक्रवारी रात्री गोळ्या झाडल्या. पोलिसांनी सांगितले, की हल्ल्यानंतर कृपाळ यांची प्रकृती अत्यवस्थ असून बरेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आसाराम बापू याच्याशी संबंधित लोकांनी आपल्याला गेल्या काही दिवसांत ठार मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या, असे कृपाळने जबानीत म्हटले आहे.

Story img Loader