निरोपाच्या भाषणात मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांचे नागरिकांना भावपूर्ण आवाहन

‘वाढता वंशवाद, असमानता, भेदभाव यामुळे भोवतालचे राजकीय वातावरण घातक बनते आहे. लोकशाहीला धोका निर्माण होतो आहे. अशा वेळी तिचे रक्षण करावेच लागेल. लोकशाहीची मूल्ये जपण्यासाठी आपल्याला जागते राहावेच लागेल,’ असे आवाहन करीत अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांनी बुधवारी देशवासीयांशी अखेरचा औपचारिक संवाद साधला.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
America Government shutdown Donald Trump Administrative spending bill approved
ट्रम्प-मस्क जोडगोळीला स्वपक्षीयांचा पहिला धक्का… नाट्यमय घडामोडींनंतर कशी टळली अमेरिकेची ‘प्रशासकीय टाळेबंदी’?
Sanjay Raut on Uddhav Devendra meeting (1)
“तू राहशील किंवा मी”, फडणवीसांना आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन; राऊत म्हणाले, “तोफा थंडावल्या”
Chhagan Bhujbal
“ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली…”, छगन भुजबळांची उद्विग्न प्रतिक्रिया; अजित पवार व पक्षावरील नाराजी व्यक्त करत म्हणाले…
Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis Rahul Narwekar
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घेतली फडणवीस, राहुल नार्वेकरांची भेट; सुनील प्रभूंनी सांगितलं नेमकी चर्चा काय झाली?
Uddhav Thackeray Maharashtra Cabinet Expansion Mahayuti
Uddhav Thackeray : महायुतीमधील नाराज नेते तुमच्या संपर्कात आहेत का? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; म्हणाले, “मला त्यांचे निरोप…”

जगातील एकमेव महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा आठ वर्षे वाहिल्यानंतर येत्या २० जानेवारी रोजी ओबामा हे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सत्तासूत्रे सोपवतील. तो क्षण काही दिवसांवर आला असताना, अमेरिकी प्रथेनुसार आपल्या मूळ शहरातून, शिकागो येथून ओबामा यांनी देशवासीयांशी संवाद साधला. सुमारे २० हजार नागरिक या भाषण कार्यक्रमास उपस्थित असले तरी अमेरिकेसह जगभरातील कोटय़वधींनी ओबामा यांचे हे निरोप भाषण मोठय़ा आस्थेने ऐकले. बोलण्यातील साधेपणा, सच्चेपणा कायम ठेवत आणि त्याच वेळी भाषेचा डौल राखत ओबामा यांनी हा संवाद साधला. भाषेची पातळी कुठेही न सोडता, कुणावरही वैयक्तिक हल्ला न करता भोवतालच्या बदलत्या वर्तमानावर भाष्य, भविष्याबाबतची आस्थापूर्ण काळजी ही त्यांच्या भाषणाची वैशिष्टय़े होतीच. त्याच वेळी, आपल्याला साथ देणाऱ्या कुटुंबीयांचे मनापासून आभार मानताना गहिवरलेले, डोळ्यांत अश्रू दाटलेले ओबामाही या वेळी कोटय़वधींनी पाहिले.

‘बदल घडवण्याच्या माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवण्यापेक्षा बदल घडवून आणण्याच्या तुमच्या स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवा,’ असे नमूद करीत ‘येस वुई कॅन या’ अमेरिकी ध्येयवाक्याची आठवण त्यांनी करून दिली. ‘जेव्हा आपण भीतीपुढे गुडघे टेकतो, तेव्हा लोकशाही मान टाकू शकते. त्यामुळे लोकशाहीवरील आक्रमणांपासून आपण सावध राहिले पाहिजे. ज्या मूल्यांच्या बळावर आपण उभे आहोत त्या मूल्यांवर घाला घातला जात असल्यास त्याचा प्रतिकार आपण करायला हवा,’ असे ते म्हणाले.

‘सन २००८ मध्ये मी अमेरिकेचा पहिला कृष्णवर्णीय अध्यक्ष म्हणून निवडून आलो. मात्र आजही आपल्या देशात वांशिक भेद ही मोठी समस्या आहेच. माझ्या निवडीनंतर, अमेरिका वंशभेदाच्या पल्याड जाईल, अशी चर्चा झाली, मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही,’ अशी भावना ओबामा यांनी व्यक्त केली.

‘लोकशाही संस्थांचे जाळे मजबूत करण्यासाठी आपण पक्षभेद विसरून काम केले पाहिजे. मतदान करणे सोपे झाले पाहिजे; अवघड नाही, आपल्यासारख्या प्रगत देशात जेव्हा कमी मतदान होते, तेव्हा त्याची दखल घेणे गरजेचे आहे. राजकारणात पैशाचे महत्त्व तेव्हा वाढते, जेव्हा लोकशाही संस्थांवरील सामान्यांचा विश्वास उडू लागतो,’ असा इशारा त्यांनी दिला.

‘आर्थिक असमानतेने वांशिक भेदाभेद वाढले आहेत; विशेषकरून हिस्पॅनिक लोकांची संख्या वाढत असताना हे घडत आहे. प्रत्येक गोष्टीत भेदाभेद होताना दिसतो आहे. प्रत्येक आर्थिक प्रश्न हा कठोर परिश्रम करणारे श्वेतवर्णीय, मध्यमवर्ग व अल्पसंख्याक यांच्या संघर्षांत तोलला गेला, तर त्याचे वाईट परिणाम होतील. आपण जर स्थलांतरितांच्या मुलांना – ते केवळ दिसायला आपल्यासारखे नाहीत म्हणून – योग्य वागणूक दिली नाही, सांभाळले नाही तर आपल्याच मुलांचे भवितव्य धोक्यात येईल; कारण ही वेगळ्या वर्णाची मुले अमेरिकेतील जास्त मनुष्यबळाचे प्रतिनिधित्व करतात,’ याकडे ओबामा यांनी लक्ष वेधले.

‘जोपर्यंत आपण आपल्या राज्यघटनेशी प्रतारणा करीत नाही, त्याच्या तत्त्वांना तिलांजली देत नाही, तोपर्यंत अमेरिकेचा कुणी पराभव करू शकणार नाही,’ असे सांगून ते म्हणाले की, ‘रशिया व चीन आमच्याशी बरोबरी करू शकत नाहीत, कारण आमचा प्रभाव मोठा आहे. हे खरे असले तरी ज्या तत्त्वांवर अमेरिका उभी आहे ती सोडता कामा नयेत. छोटय़ा शेजारी देशांना धाकात ठेवणारा शक्तिशाली देश अशी आपली भूमिका नसावी.’

ते म्हणाले की, ‘अध्यक्षपदाची आठ वर्षे मी अनुभवली आहेत, आता जातानाच्या काळात मला जास्त देशाप्रति जास्त आशावाद वाटतो आहे, आठ वर्षांपूर्वीच्या तुलनेत प्रत्येक बाबतीत अमेरिका उत्तम, मजबूत स्थानावर आहे. मी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो. आजची पिढी नि:स्वार्थी, सर्जनशील, देशभक्तीने ओतप्रोत भरलेली आहे हेच मला जाणवले. सर्वसमावेशक अमेरिकेवर त्यांचा विश्वास आहे. सतत बदल हे अमेरिकेचे व्यवच्छेदक लक्षण आहे, लोकशाहीसाठी निर्भीडपणे काम करण्याचे व्रत या पिढीने खांद्यावर घेतले आहे, त्यामुळे देशाचे भवितव्य चांगल्या हातांमध्ये जाणार आहे, याबद्दल मला शंका नाही,’ अशी भावना त्यांनी नोंदवली.

मुसलमानही देशभक्तच

नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांचे थेट नाव न घेता त्यांच्या अनेक वादग्रस्त मुद्दय़ांवर ओबामा यांनी टिप्पणी केली. ‘मुसलमानांना सापत्न वागणूक देणे मला मुळीच मान्य नाही.. आपल्या देशातील मुसलमान, आपल्याएवढेच देशभक्त आहेत,’ असे उद्गार ओबामा यांनी काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

 

Story img Loader