गेले काही महिने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीच्या निकालावर सर्व जगाचे लक्ष केंद्रीत होते. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार मिट रोन्मी आणि आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यामध्ये अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत सरतेशेवटी ओबामांनी आघाडी घेत विजय प्राप्त केला आहे. ‘ ‘आणखी चार वर्षे. हे सर्व फक्त तुमच्यामुळे साध्य झाले. धन्यवाद’, असे म्हणत बराक ओबामांनी आपली पुर्ननिवड झाल्यानंतर अमेरिकन मतदारांचे आभार मानले.
काल (मंगळवार) झालेल्या बराक ओबामा आणि रिपल्बिकन पक्षाचे मिट रोम्नी यांच्यातील चुरशीची लढत व्हाईट हाऊस मध्ये सुरू होती. ओहीओ आणि लोव्हा येथे रिपल्बिकन पक्षाचे मिट रोम्नी यांच्या बाजूने कमी मतदार असल्याचा फायदा बराक ओबामा यांना झाला आणि रोम्नींच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाला. डेमोक्रेटीक पक्षाचे बराक ओबामा पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येण्यासाठी २७० इलेक्ट्रोल मतांची गरज होती आणि बराक ओबामा यांच्या बाजूने २९० इलेक्ट्रोल मते तर रिपल्बिकन पक्षाचे मिट रोम्नी यांना २०३ इलेक्ट्रोल मते मिळाली आहेत.
रॉमनी यांनी मोंटाना, नॉर्थ कॅरोलिना, यूटा, टेक्सास, उत्तर आणि दक्षिण डाकोटा, लुझियाना या राज्यांमध्ये विजय मिळवला असून न्यूयॉर्क, मिशिगन, डेलावेयर, विस्कोसिन, इलिनॉय, न्यू हैम्पशर, एलबम या राज्यांमध्ये ओबामांनी विजय मिळवला आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा