आंतरराष्ट्रीय सीमेसह जम्मू आणि काश्मीर सीमेवर सीमा सुरक्षा दलाकडून(बीएसएफ) सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमेवर गेल्या काही दिवसांपासून घुसखोरीच्या वाढत्या घटना पाकिस्तानातील लष्करे तैय्यबा या दहशतवादी संघटनेकडून भारतात प्रजासत्ताक दिनी मोठा हल्ला करण्याच्या इराद्याने होत असल्याची दाट शक्यता आहे. घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्यास भारतात मोठा हल्ला करण्याचा इरादा लष्करे तैय्यबाचा आहे.
ओबामांच्या भारतभेटीसाठी अभूतपूर्व सुरक्षा
सुत्रांच्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची वेळ साधून देशात मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखली जात असल्याची शक्यता फेटाळता येण्यासारखी नाही. ओबामांच्या भारतभेटीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेत वाढ करण्याची आल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर, एका राष्ट्राच्या प्रमुखाचे देशात आगमन होत असल्यामुळे सुरक्षेची निर्धारित नितीमुल्ये पाळण्याच्या उद्देशाने सीमेवरील सुरक्षेत वाढ केल्याचे स्पष्टीकरण केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दिले आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीत भारतासह अमेरिकी सुरक्षा यंत्रणांची खास पथके राजधानीत आतापासूनच तळ ठोकून बसली बसली असून दिल्लीला एखाद्या अभेद्य किल्ल्याचे स्वरूप येत आहे. विशेष बाब म्हणजे यंदा प्रथमच विमानतळ, रेल्वे व बस स्थानके आणि अन्य मोक्याच्या ठिकाणी ८० ते १०० फेस रेकग्निशन कॅमेरे बसवले जाणार आहेत. दिल्ली पोलिसांचे ८०,००० कर्मचारी, निमलष्करी दलांचे २०,००० जवान, हरयाणा, राजस्थानसारख्या शेजारी राज्यांमधून मागवलेले अधिकचे सुरक्षा कर्मचारी, इंडिया रिझव्र्ह बटालियन्सचे जवान राजधानीत तैनात केले जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा