अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रिपब्लिकन पार्टीचे मीट रोमनी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. रोमनी निवडून आल्यास अमेरिकेची अर्थव्यवस्था खिळखिळी होईल आणि त्यामुळे देशाची परदेशात नाचक्की होईल, असा हल्ला ओबामा यांनी चढविला.
अमेरिकेला अधिक सुस्थितीत आणण्याचे आश्वासन देऊन ओबामा म्हणाले की, आपला प्रतिस्पर्धी मध्यमवर्गाचे नुकसान करणार असून त्यामुळे परदेशात अमेरिकेचा पाणउतारा होईल, त्यामुळे आपले भविष्य निवडा, असे आवाहनही ओबामा यांनी केले. आपला मार्ग खडतर आहे, मात्र अमेरिकेत आर्थिक बदल घडविणारा आहे. प्रवास अत्यंत अवघड आहे, परंतु तो उत्तम स्थानावर पोहोचविणारा आहे, असे ओबामा म्हणाले.  

Story img Loader