उत्तर प्रदेशमध्ये यंदा लोकसभेचे निकाल धक्कादायक लागले. ज्या उत्तर प्रदेशच्या जिवावर भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. त्याच राज्यात भाजपाला दुसऱ्या क्रमाकांवर समाधान मानावे लागले. समाजवादी पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. या निकालाचे परिणाम आता खालपर्यंत जाणवत आहेत. नुकतेच बदायूं येथील बिलसी गावात एक धक्कादायक घटना घडली. एका १२ वर्षीय गतीमंद मुलाचे केशकर्तनकाराने जबरदस्तीने टक्कल केले. या मुलाच्या कुटुंबियांना दलित पार्श्वभूमी आहे. तसेच मुलाच्या पालकांनी निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिला होता. त्याचाच राग मनात धरून केशकर्तनकाराने सदर कृत्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिलसी गावातील पोलीस ठाण्याचे प्रमुख कमलेश कुमार मिश्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, मुलाच्या आईच्या तक्रारीनंतर भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३२३, कलम ५०४ आणि ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून त्यानुसार कारवाई करण्यात येईल.

योगी आदित्यनाथ सरसंघचालक मोहन भागवतांची भेट घेणार, लोकसभा निवडणूक निकालावर मंथन?

मुलाच्या आईने आपल्या तक्रारीत म्हटले की, लोकसभा निवडणुकीत आमच्या कुटुंबाने भाजपाला पाठिंबा दिला. त्यामुळे आमच्या गावातील काही लोक आणि संबंधित केशकर्तनकार नाराज होता. त्यामुळे त्यांनी आमच्या घराच्या अंगणात खेळत असलेल्या मुलाला जबरदस्ती उचलून नेले आणि त्याचे टक्कल केले. या घटनेमुळे माझा मुलगा प्रचंड धक्क्यात आहे. माझ्या पतीने केशकर्तनकार आणि त्या लोकांना या घटनेचा जाब विचारला. मात्र त्यांनी अपमानास्पद प्रतिक्रिया दिल्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

तर दुसरीकडे केशकर्तनकाराच्या नातेवाईकांनी सदर आरोप फेटाळून लावले. सदर मुलाने त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार आधी टक्कल करून घेतले आणि त्यानंतर हा आरोप केला, असा दावा त्यांनी केला. बदायूंमध्ये लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे आदित्य यादव निवडून आले आहेत. त्यांनी भाजपाच्या दुर्विजय सिंह शाक्य यांचा ३४,९९१ मतांनी पराभव केला. तर बसपाचे मुस्लीम खान हे तिसऱ्या स्थानावर राहिले.