उत्तर प्रदेशातील बरेली येथे कावड यात्रेवर जमावाने दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या कावड यात्रेत जवळपास २ हजार भाविकांचा समावेश होता. ही कावड यात्रा पवित्र जल भरण्यासाठी जात असताना जोगी नवादा भागातील शाहनूरी मशीद परिसरात हा हल्ला झाला. या घटनेत सुमारे डझनभर भाविकांसह काही पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बरेलीचे पोलीस अधीक्षक राहुल भाटी यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कावड यात्रा कछला घाट येथून पवित्र जल आणण्यासाठी जात होती. यावेळी शाहनूरी मशीद आणि आसपासच्या घरांवरून या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक प्रभाकर चौधरी यांनी सांगितलं, “आज बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कावड यात्रा निघाली होती. ही यात्रा एका धार्मिक स्थळाजवळून जाताच या यात्रेवर काहीतरी फेकलं. यामुळे दोन गटात वाद झाला. त्यातून दगडफेक झाली. पोलिसांना मिळालेल्या व्हिडीओ फुटेजमध्ये दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक केल्याचं दिसत आहे.”

हेही वाचा- प्रवासी तरुणीबरोबर रॅपिडो चालकाचं घृणास्पद कृत्य, “एका हाताने दुचाकी चालवत दुसऱ्या हाताने…”

हा प्रकार घडल्यानंतर पोलीस दलाने तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कावड यात्रेनं पुढे मार्गक्रमण केलं. या घटनेत कोणीही गंभीर जखमी झालं नाही, असेही त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bareilly kanwar yatra stone pelting police force deployed uttar pradesh news rmm
Show comments