उत्तर प्रदेशच्या बरेलीमधील इत्तेहाद-ए-मिल्लत परिषदेचे मौलवी तौकिर रजा खान यांनी शुक्रवारी जेल भरो आंदोलनाची हाक दिल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तौकिर रजा खान यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राहावी, यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच तौकिर रजा यांना ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी ज्ञानवापी मशिदीबाबतचा निकाल वाराणसी न्यायालयाने दिला होता. त्या निकालानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या आवाहनाचा विरोध करत तौकिर रजा खान यांनी जेल भरोची घोषणा केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभेत बोलत असताना वाराणसी मधील ज्ञानवापी मशीद आणि मथुरामधील शाही इद्गाह दर्ग्यावरील हक्क मुस्लीम समुदायाने सोडून द्यावा, असे आवाहन केले होते. या आवाहनाला तौकिर रजा खान यांनी विरोध केला होता. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणार राखण्यासाठी १,००० पोलिसांना तैनात केले आहे. बरेलीमधील सर्व महत्त्वाच्या भागावर चौक्या उभारण्यात आलेल्या आहेत. परिस्थिती हाताळण्यासाठी सहा अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि १२ प्रांत अधिकारी नेमण्यात आले आहेत.
Pakistan Elections : दहशतवादी हाफिज सईदच्या मुलाला पाकिस्तानी जनतेनं निवडणुकीत पराभूत केलं
तौकिर रजा यांनी कालच उत्तराखंडमधीर हिंसेवर वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले की, तुम्ही आमच्या घरावर बुलडोजर चालवणार असाल तर आम्ही गप्प बसायचे का? आता आम्ही कोणत्याही बुलडोजरला सहन करणार नाही. जर सर्वोच्च न्यायालय आमची दखल घ्यायला तयार नसेल तर आम्हाला स्वतःचे संरक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. जर कुणी आरोपी असेल तर त्याच्या घरावर, मदरशा किंवा मशीदीवर बुलडोजर चालविण्याचे कारण काय? आम्ही याचा विरोध करणार. देशात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविरोधात आम्ही बरेलीमधून अभियान सुरू करत आहोत.