Russia’s entry into the Syrian civil war 2024 : सीरियात घडत असलेल्या घडामोडींदरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना रशियाने आश्रय दिला असून, त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही तासांपूर्वी, सीरियातील बंडखोरांच्या हल्ल्यामुळे असाद यांचे विमान कोसळल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, रशियाने दिलेल्या माहितीनंतर शर अल-असद सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

असद कुटुंबीयांना रशियात आश्रय

दरम्यान आता रशियाने राष्ट्राध्यक्ष असद आणि त्यांच्या कुटुंबीयांना औपचारिकपणे आश्रय दिला आहे. सध्या त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मॉस्कोमध्ये गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले आहे. एकीकडे राष्ट्राध्यक्ष देश सोडून पळून गेले आहेत, पण सीरिया मात्र बंडखोरांच्या ताब्यात आहे. सीरियातील बंडखोरांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ८ डिसेंबर २०२४ ला असद यांच्या पक्षाच्या ५० वर्षांच्या दडपशाहीनंतर एका वाईट युगाचा अंत झाला. आता सीरियात नव्या युगाची सुरुवात होणार आहे.

हे ही वाचा : परराष्ट्र सचिव मिस्राी आज ढाक्यात; बांगलादेशला दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची आशा

रशियाची भूमिका

या सर्व घडामोडींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीरियातील जे सैनिक शरणागती पत्करण्यास तयार झाले आहेत त्यांना काहीही न करण्याचे आवाहन केले जात आहे. नव्या सीरियाची उभारणी करायची आहे, यावर भर दिला जात आहे. आता एकीकडे बंडखोरांनी ताब्यात घेतल्याने सीरियाचे भविष्य आव्हानांनी भरलेले दिसत आहे, तर दुसरीकडे रशियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षात रशियाने सीरियात असद सरकार चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हे ही वाचा : सीरियात असादपर्वाची अखेर सत्ता उलथवण्यात बंडखोरांना यश; पंतप्रधानांची मुक्त निवडणुकांची घोषणा

पुतिन यांच्याकडून असद यांना पूर्वीही मदत

यापूर्वी २०१५ मध्ये असद यांच्या जीवाला धोका निर्माण झाला तेव्हा पुतिन यांनी तात्काळ हजारो रशियन सैन्य सीरियात पाठवले होते. त्यावेळी रशियाला संपूर्ण जगासमोर जागतिक महासत्ता म्हणून आपली प्रतिमा प्रस्थापित करायची होती. त्यांच्या या कृतीला काही वर्षे यश आले होते, मात्र आता बंडखोर सत्तेत आल्याने त्यांच्यासाठी सर्व समीकरणे बदलली आहेत. अशा स्थितीत रशियाला सीरियाच्या भवितव्यानुसार आपली रणनीती बदलावी लागणार आहे.

सीरियन बंडखोरांनी दमास्कसमध्ये प्रवेश केल्यानंतर, राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना रविवारी रशियात पळून जावे लागले. यानंतर अमेरिकेचे निर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन असद यांचे संरक्षण करण्यास कमी पडले असे म्हटले आहे.

Story img Loader