बीबीसीवर सादर होणाऱ्या ‘टॉप गीयर’ या अत्यंत  लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालक जेरेमी क्लार्कसन यांची त्यांच्या पदावरून गच्छंती करण्यात आल्यानंतर बीबीसीच्या प्रमुखांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्याचे वृत्त असून स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
बीबीसीचे महासंचालक टोनी हॉल यांना गेल्या बुधवारी एक ई-मेल आला असून त्यामध्ये हॉल यांना मारण्याची धमकी देण्यात आली.  ‘टॉप गीयर’ कार्यक्रमाचे निर्माते ओइसीन टायमॉन यांना ४ मार्च रोजी मारहाण केल्याप्रकरणी क्लार्कसन यांच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्यात येणार नाही, असे हॉल यांनी जाहीर केल्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा