वयाच्या ९६ व्या वर्षी ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी गुरुवारी जगाचा निरोप घेतला. बऱ्याच काळापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधानच्या वृत्तानंतर जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात आले. दरम्यान, एलिझाबेथ यांच्या निधनाचे वृत्त देताना बीबीसीचे कर्मचारी फोटोसेशन करत असल्याचा दावा केला जातोय. याच कारणामुळे बीबीसीवर टीका केली जात आहे.
हेही वाचा >> महात्मा गांधींनी दिलेली ‘ती’ भेटवस्तू राणी एलिझाबेथ यांनी आयुष्यभर सांभाळली, मोदी भेटीतही झाला होता उल्लेख
बंकिंगहम पॅलेसने एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची माहिती सार्वजनिक केल्यानंतर बीबीसी लंडनने निधनाचे अधिकृत वृत्त दिले. मात्र बीबीसीचे वृत्तनिवेदक ह्यू एडवर्ड्स (Huw Edwards) निधनाचे वृत्त देत असताना दुसरीकडे मागे फोटो काढले जात होते. हा सर्व प्रकार असंवेदनशील असल्याचे म्हणत बीबीसीवर टीका केली जात आहे.
हेही वाचा >> षण: राणीनंतरचा ब्रिटन..राष्ट्रगीतापासून राष्ट्रध्वजापर्यंत बरंच काही बदलणार, नेमके काय असतील हे बदल?
बीबीसीच्या ऑफिसमध्ये नेमका काय प्रकार घडला?
बीबीसीचे वृत्तनिवेदक ह्यू एडवर्ड्स राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधानाचे वृत्त अतिशय गंभीरपणे देत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तसेच आवाजात विषयाचे गांभीर्य स्पष्टपणे दिसत होते. मात्र याच वेळी बीसीसीच्याऑफिसमध्ये इतर दोन कर्मचारी फोटो काढत होते. तसा दावा केला जातोय. मध्येच तिसरा कर्मचारी आल्यानंतर हे दोन्ही कर्मचारी परत आपल्या जागेवर बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.