आयपीएल स्पॉट फिक्सिंगप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन यांना अटक झाल्यानंतर श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. श्रीनिवासन यांनी स्वेच्छेने राजीनामा न दिल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ‘पीटीआय’ने दिलीये.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयमधील एका गटाने श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. गुरुनाथ मयप्पन यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर मयप्पन यांची भेट घेण्यासाठी श्रीनिवासन शनिवार सकाळी  मुंबईला रवाना झाल्याचे समजते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा