भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नेमलेल्या समितीने जरी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या सहमालकांना क्लीन चीट दिली असली, तरी त्याला आपण जास्त महत्त्व देत नसल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले. या प्रकरणी सुरू असलेला पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत वाट बघायला हवी, असा सल्लाही मंत्रालयाने बीसीसीआयला दिला.
बीसीसीआयने जरी त्यांना क्लीन चीट दिली असली, तरीही या प्रकरणी सुरू असलेला पोलिस तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी वाट बघायला हवी, असे केंद्रीय क्रीडा सचिव पी. के. देव यांनी स्पष्ट केले.
चेन्नई सुपरकिंग्जचे सहमालक गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे सहमालक राज कुंद्रा यांची स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणी चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने दोन सदस्यीय समिती नेमली होती. समितीमध्ये उच्च न्यायालयाचे माजी न्या. टी. जयराम चौता आणि आर. बालासुब्रमण्यम यांचा समावेश होता. या समितीने रविवारी आपला अहवाल बीसीसीआयच्या कार्यकारी समितीकडे दिला. या अहवालात गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांनी कोणतेही गैरकृत्य केल्याचा पुरावा आढळलेला नसल्याचे म्हटले आहे.
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयच्या अहवालाला महत्त्व देत नाही – क्रीडा मंत्रालय
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नेमलेल्या समितीने जरी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या सहमालकांना क्लीन चीट दिली असली, तरी त्याला आपण जास्त महत्त्व देत नसल्याचे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.
First published on: 29-07-2013 at 06:06 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci should wait for police probe to end sports ministry