आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अटकेत असेलेले चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सीईओ गुरूनाथ मयप्पन यांच्यावर क्रिकेट संबंधी कोणतेही कामकाज करण्यावर बीसीसीआयकडून बंदी घालण्यात आली आहे.
“चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या नियामक मंडळातील सभासदांपैकी एक असलेल्या गुरुनाथ मयप्पन यांना मुंबई पोलिसांनी स्पॉट फिक्सिंग प्रकरणावरून अटक केल्याची बीसीसीआयने दखल घेत क्रिकेट संबंधी कोणतेही व्यवहार करण्यावर मयप्पन यांच्यावर बंदी घालण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे” असे बीसीसीआयचे सचिव संजय जगदाळे यांनी स्पष्ट केले.
मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री गुरुनाथ मयप्पन यांना आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी अटक केली आहे. काल शनिवारी मयप्पन यांना मुबंई न्यायालयात हजर करण्यात आले आणि यात २९ मे पर्यंत त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. बीसीसीआय अध्यक्ष एन.श्रीनिवासन आज रविवार यासर्व प्रकरणासंबंधी पत्रकारपरिषद घेण्याची शक्यता आहे.  

Story img Loader