वॉशिंग्टन : वाढते गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगा आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास करू नका, असे आवाहन  अमेरिकेने आपल्या नागरिकांना शुक्रवारी केले. भारतात प्रवास करण्याबाबतची नियमावली अमेरिकेने शुक्रवारी जारी केली. त्यानुसार प्रवास नियमावलीची पातळी दोन पर्यंत कमी केली. ती आधी चापर्यंत होती. गुन्हे आणि दहशतवादामुळे भारतात फिरताना अतिसावध राहा, असे अमेरिकेने जारी केलेल्या प्रवास नियमावलीत म्हटले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने गुरुवारी पाकिस्तानबाबतची प्रवास नियमावली जाहीर करून त्याला तिसऱ्या पातळीवर ठेवले होते. दहशतवाद आणि सांप्रदायिक हिंसाचारग्रस्त पाकिस्तानात प्रवास करणार असाल तर त्याबाबत पुनर्विचार करा, असा इशारा आपल्या नागरिकांना दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहशतवाद आणि अशांततेमुळे जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात (पूर्व लडाख आणि त्याची राजधानी लेह वगळता) प्रवास करू नका. सशस्त्र संघर्षांच्या शक्यतेमुळे भारत-पाकिस्तान १० किमी परिसरात प्रवास करू नका, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. भारतातील गुन्हे अहवालानुसार तेथे वेगाने वाढणाऱ्या गुन्ह्यांपैकी बलात्कार हा एक आहे, असे अमेरिकेने नमूद केले आहे.