१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस भारताच्या गौरवशाली इतिहासात नोंदवला गेला आहे. कारण याच तारखेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. या दिवशी देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. प्रत्येकाच्या उत्साह असतो. दरम्यान, हाच उत्साह आणि जल्लोषा आज अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर बघायला मिळाला. परंपरेनुसार स्वातंत्र दिनाच्या एक दिवस आधी अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच यावेळी भारत पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये मिठाईचीही देवाण-घेवाण करण्यात आली.

अटारी-वाघा बॉर्डरवर जल्लोषाचे वातावरण

परंपरेनुसार स्वातंत्र दिनाच्या एक दिवस आधी अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर प्रचंड गर्दी जमली होती. अनेक लोक देशभक्तीपर गाणी गात होती. तसेच भारतीय ध्वज फडकवण्यात येत होता.

बीएसएफ आणि पाक रेंजर्समध्ये मिठाईची देवाण-घेवाण

तत्पूर्वी, रविवारी (१४ ऑगस्ट) पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पाकिस्तान रेंजर्स आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) यांनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर मिठाईची देवाणघेवाण केली जाते. भारताने आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मिठाई घेतली आणि पाकिस्तानला मिठाई दिली.