सेंद्रिय घटकांपासून तयार केलेला खास ऑरगॅनिक बिछाना हा तुम्हाला आरोग्यवान ठेवणार आहे. या बिछान्याची किंमत आहे अवघी ३४००० अमेरिकी डॉलर! हा सुखद बिछाना न्यूयॉर्क शहरात सोहो येथे विक्रीस ठेवला असून त्याचे नाव ट्रायटन असे आहे. त्यात कुठलाही धातू वापरलेला नाही. या बिछान्यात रबराच्या झाडापासून नैसर्गिक पद्धतीने काढलेल्या रबराचा वापर केला असून घोडय़ाचे केस, नारळाच्या शेंडय़ा, रेशीम, कापूस, कॅक्टसचे धागे, समुद्री शैवाल यांचाही उपयोग केला आहे असे ‘न्यूयॉर्क डेली’ने म्हटले आहे. यातील प्रत्येक घटक हा मानवी आरोग्यास पोषक आहे. यातील समुद्री शैवाल हे अस्थमा, अ‍ॅलर्जी व थायरॉईड संप्रेरकांना नियंत्रित करते, घोडय़ाचे केस हे संधिवातावर गुणकारी असतात, कॅक्टसमुळे आद्र्रता नियंत्रित होते. नारळाच्या शेंडय़ा या वायुविजन राखतात व वीस वर्षे लवचिकता ठेवतात.

Story img Loader