बिअर हे जगातील सर्वात लोकप्रिय मद्यपेयांपैकी एक आहे. बिअरला भरपूर पाणी लागते. सिंगापूरच्या वॉटर एजन्सीने ‘न्यूब्रू’ नावाच्या बिअरची निर्मिती केली आहे. ही बिअर नेहमीच्या बिअरपेक्षा वेगळी आहे. कारण ही लघवी आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून बनवण्यात आली आहे.

लघवीसोबत सांडपाण्याचाही वापर

ही बिअर एका द्रवापासून बनविली जाते, जी सांडपाण्याचा पुनर्वापरातून तयार केली जाते. ही बिअर सिंगापूरच्या पाणीपुरवठ्यातून पंप आणि फिल्टर केली जाते. अलिकडच्या वर्षांत सिंगापूरमध्ये वाढलेल्या पाण्याच्या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे हे देखील त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. सिंगापूरला पाणीटंचाईच्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे आणि त्यांना तोंड देण्यासाठी हा एक सर्जनशील मार्ग असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

बिअरची होणार चाचणी

न्यूब्रूचे लेबल सिंगापूरच्या सर्वात हिरव्या बिअरपैकी एक असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ‘न्यूब्रू’हे फिल्टर केलेले द्रव आहे जे लघवी आणि सांडपाण्याच्या पाण्यापासून तयार होते. गेल्या २० वर्षांपासून देशात याचा वापर होत आहे. ही बिअर अस्वच्छ वाटत असली तरी, मंजूर होण्यापूर्वी याची चाचणी आणि परीक्षण केले जाणार आहे.

Story img Loader