मला अटक केली तर निवडणुकीत त्याची जबर किंमत मोजण्याची तयारी ठेवा… असा इशारा स्वयंघोषित संत आसाराम बापू यांनी त्यांना अटक होण्यापूर्वी राजस्थानमधील सरकारला दिला होता. 
नातीसोबत आजोबांनी बंद खोलीत वेळ घालवला तर गुन्हा नाही – आसाराम बापू
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून गेल्या शनिवारी रात्री आसाराम बापूंना इंदूरमधून अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी इंदूरमध्ये जमलेल्या समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात आसाराम बापूंनी राजस्थानमधील पोलिसांनाही इशारा दिला होता. आपल्यामागे वेगवेगळ्या देशांतील चार कोटींहून अधिक भक्तगण आहेत. मला अटक झाली, तर त्याची जबर किंमत तुम्हाला मोजावी लागेल. अटक होण्यापूर्वी ३१ ऑगस्टला आसाराम बापू स्वतःच्या समर्थकांपुढे भाषण करीत असताना माध्यमाच्या प्रतिनिधींना तेथून बाहेर काढण्यात आले होते. आता मात्र ते भाषण आसाराम बापूंच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहे.
‘आसाराम बापूंवर आंधळेपणाने विश्वास ठेवला तेच चुकले’
पोलिस आसाराम बापूंना अटक करण्यासाठी आल्यावर ते म्हणाले, तुम्हाला जे काही करायचे आहे ते करा. मात्र, निवडणुका जवळ आल्या आहेत हे लक्षात ठेवा. कोणत्या श्रेष्ठींनी तुम्हाला हे सर्व करायला सांगितलंय, याच्याशी मला काही देणे-घेणे नाही. मात्र, तुमच्या खुर्च्या आणि कायदा-सुव्यवस्था सांभाळा. तुम्ही मला जर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले, तर त्याची किंमत तुम्हाला निवडणुकीत नक्कीच मोजावी लागेल.
आसाराम बापूंची पौरुषत्व चाचणी ‘पॉझिटिव्ह’ 

Story img Loader