Serial Killers women: आंध्रप्रदेश पोलिसांनी गुरूवारी तीन सीरियल किलर महिलांना तेनाली जिल्ह्यातून अटक केली. या महिलांनी २०२२ पासून तीन महिला आणि एक पुरुष अशी चार जणांची हत्या केलेली आहे. या महिला अनोळखी लोकांशी आधी मैत्री करत असत. मग त्यांना गुंगीचे औषध मिश्रीत पेय प्यायला देत. समोरचा व्यक्ती बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्याकडील मौल्यवान वस्तूंची चोरी करून त्यांची हत्या केली जाई.

जून २०२२ मध्ये सीरियल किलर महिलांनी पहिली हत्या केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. तिघींना नगुर बी. या महिलेचा पहिला खून केला. त्यानंतर आणखी दोघांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कसेबसे वाचले. १३ जून रोजी बंदलमुरी गावातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. चौकशी केल्यानंतर मृत महिलेचे नाव नगुर बी. असल्याचे समोर आले. या खूनाचा तपास करत असताना पोलिसांना रजनी, व्यंकटेश्वरी आणि रामनम्मा या तीन महिलांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला.

RG Kar Rape-Murder Case
RG Kar Rape-Murder Case : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणात मोठी अपडेट! पीडितेच्या वकिलाची खटल्यातून माघार; सांगितलं ‘हे’ कारण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
accused in satish wagh murder case get police custody till december 20
Satish Wagh Murder: सतीश वाघ खून प्रकरणातील आरोपींना २० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध

हे वाचा >> बलात्कार करून फरार झालेला भाजपा कार्यकर्ता ४० दिवसांनंतर गजाआड, न्यायालयाचाही दणका

पोलिसांच्या नोंदीनुसार व्यंकटेश्वरी नामक आरोपी महिला याआधीही काही गुन्ह्यात सामील होती. ३२ वर्षीय व्यंकटेश्वरी तेनाली जिल्ह्यात स्वयंसेवक म्हणून काम करत होती. तसेच कंबोडियामध्ये जाऊन सायबर क्राइम सारख्या गुन्ह्यांसाठी तिने काम केले होते. या महिला गुंगीचे औषध म्हणून सायनाइडचा वापर करत असत. एसी दुरुस्त करणाऱ्या एका मित्राकडून त्या सायनाईड मिळवत असत. पोलिसांनी तीनही महिलांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सायनाईड आणि इतर वस्तूंचा साठा जप्त केला आहे.

आणखी वाचा >> West Bengal Crime : संतापजनक! पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार; बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर आढळली

तेनाली जिल्ह्यातील या कारवाईमुळे केरळमध्ये घडलेल्या सायनाईड प्रकरणाची आठवण होते. तेथील एका महिलेने नवऱ्याच्या कुटुंबातील सहा जणांची १४ वर्षांत सायनाईड देऊन हत्या केली होती. तेनालीचे पोलीस अधीक्षक सतीश कुमार यांनी सांगितले की, तीनही महिलांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तसेच त्यांनी लोकांना आवाहन करताना सांगितले की, अनोळखी लोकांशी मैत्री करताना त्यांनी खबरदारी घेतली पाहिजे.

Story img Loader