जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार यांच्या वाहन ताफ्यावर बिहारमध्ये मंगळवारी सांयकाळी करण्यात आला. बेगुसराय जिल्ह्यातील दहिया गावाजवळ हा हल्ला झाला. या हल्ल्यात ताफ्यातील अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे कन्हैय्याकुमार समर्थकांचे म्हणणे आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत.

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील भगवानपूर बाजारातील दुर्गा मंदिराजवळ मंगळवारी सांयकाळी कन्हैय्याकुमार समर्थक आणि दुर्गा पूजा समितीच्या सदस्यांमध्ये वाहन पार्क करण्यावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि कन्हैय्याकुमार यांच्या ताफ्यातील सुमारे अर्धा डझन वाहनांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये दुर्गा पूजा समितीचे २ कार्यकर्ते जखमी झाले. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आल्याचे भगवानपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख दीपक कुमार यांनी सांगितले. जखमींच्या तक्रारीनुसार कन्हैय्याकुमार यांच्या ताफ्याविरोधात कारवाई केली जाईल. तर दुसरीकडे कन्हैय्याकुमार आणि त्यांच्या समर्थकांनी जीवघेणार हल्ल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Story img Loader