पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्पष्टीकरण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नवी दिल्ली : शेती कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आणण्यात आले, मात्र लोकांच्या हितासाठी ते मागे घेण्यात आले, असे उत्तर प्रदेश विधानसभेसाठी गुरुवारी होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या आदल्या दिवशी, बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम केले असून, त्यांनीही आपल्याला पाठिंबा दिला आहे असे मोदी म्हणाले. पाचही राज्यांमध्ये भाजप विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपने नेहमीच स्थैर्यासह काम केले असून, लोकांकडून पक्षाला ‘अँटी- इन्कमबन्सी’ ऐवजी ‘प्रो- इन्कम्बन्सी’चे वातावरण लाभले आहे, असेही त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
‘घराणेशाहीच्या राजकारणावर’ कडाडून हल्ला चढवताना, हा ‘मोठा धोका’ आणि ‘लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू’ असल्याचे मोदी म्हणाले. उत्तर प्रदेशातील ‘बनावट समाजवादी’ या कोटीबाबत स्पष्टीकरण देताना, या पक्षांना केवळ ‘परिवारवादाची’ काळजी असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी अमान्य केला. ते म्हणाले की, निवडणुका असल्या तरी या यंत्रणा त्यांच्या निकषांनुसार काम करत असतात. या यंत्रणा भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कारवाई करून राष्ट्रीय संपत्तीची वसुली करत असल्याने सरकारचे कौतुक करायला हवे.
जानेवारीत लुधियाना- फिरोझपूर महामार्गावर आपल्या सुरक्षेचा भंग झाल्याच्या विषयाबद्दल बोलण्यास नकार देताना मोदी म्हणाले की, आपल्या वक्तव्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुरू केलेल्या तपासावर प्रभाव पडू शकेल. ‘मी या मुदद्यावर मौन बाळगले आहे. सर्वोच्च न्यायालय या मुद्दय़ाकडे गांभीर्याने लक्ष देत आहे. मी या विषयावर कुठलेही वक्तव्य केल्यास त्याचा तपासावर प्रभाव पडेल आणि हे योग्य नाही’,अ्से त्यांनी सांगितले.