पीटीआय, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नोकरीची नियुक्तिपत्रे दिल्याचे जाहीर केले. ‘‘राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) सत्ता असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत गेल्या एका महिन्यात अशाच प्रकारच्या मोहिमा घेण्यात आल्या. ‘डबल इंजिन’ सरकारचा (केंद्रात व राज्यात एकाच आघाडीचे सरकार) हा दुहेरी फायदा आहे. तरुणांना नियुक्तीपत्रे देण्याची मोहीम कायमस्वरूपी सुरू राहील,’’ असे मोदी यांनी मंगळवारी सांगितले. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या दुसऱ्या रोजगार मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिमाचल प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या आणि गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीसह अनेक निवडणुकांत ‘डबल इंजिन सरकार’ हा भाजपने प्रचाराचा मुद्दा केला आहे. मोदींनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंगळवारी एकूण ७१ हजार ५६ नियुक्तिपत्रे नवीन भरती झालेल्या युवकांना वितरित केली. निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या गुजरात व हिमाचल प्रदेश वगळता देशभरातील ४५ ठिकाणी नियुक्तीपत्रांच्या प्रत्यक्ष प्रती देण्यात आल्या. मोदी म्हणाले, की केवळ एका महिन्यात केंद्रशासित प्रदेश व ‘एनडीए’शासित राज्यांनी हजारो तरुणांना नियुक्तिपत्रे दिली आहेत.

मोदी यांनी सांगितले, की गेल्या महिन्याभरात महाराष्ट्र व गुजरातने हजारो नियुक्तिपत्रे दिली आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश सरकारनेही अनेक तरुणांना नियुक्तिपत्रे दिली. जम्मू-काश्मीर, लडाख, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव, चंडीगड येथेही रोजगार मेळावे आयोजित केले आहेत आणि हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे. गोवा व त्रिपुराची सरकारेही अनुक्रमे २४ नोव्हेंबर आणि २८ नोव्हेंबर रोजी रोजगार मेळावा घेणार आहेत. सरकारने देशातील तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. तरुण हे देशाचे सर्वात मोठे सामथ्र्य आहेत. त्यांच्या कलागुणांचा राष्ट्रउभारणीत उपयोग व्हावा यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.