कोलकाता : ‘बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडी पाहता केंद्र सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे (यूएन) बांगलादेशात शांतिसेना (पीसकीपिंग मिशन) तैनात करण्याची विनंती करावी, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना परत आणण्यासंबंधी हस्तक्षेप करावा,’ अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केली.

बांगलादेशमधील सध्याच्या घडामोडींवर भारताची भूमिका परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत मांडावी, अशीही मागणी बॅनर्जी यांनी केली. बॅनर्जी यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या सत्राला संबोधित केले. ‘‘दोन्ही देशांच्या द्विस्तरावरील संबंधांवर बोलणे अधिकाराबाहेरचे आहे. मात्र, बांगलादेशमधील घडामोडी पाहता आणि पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांचे बांगलादेशमधील अनुभव सांगितल्यानंतर, बांगलादेशातून भारतात येणाऱ्या अनेकांना अटक झालेल्या घटनांनंतर, येथील ‘इस्कॉन’च्या प्रतिनिधींशी बोलल्यानंतर, मला विधानसभेत यावर बोलणे भाग पडले आहे,’’ असे बॅनर्जी म्हणाल्या.

गेल्या दहा दिवसांपासून केंद्र सरकार या विषयावर काहीही बोलत नसल्याबद्दल त्यांनी टीका केली. हा राजकीय मुद्दा नसून, बंगाली हिंदूंसाठी हा अस्तित्वाचा मुद्दा असल्याचे बॅनर्जी म्हणाल्या.

हेही वाचा >>> गडकरींचा आसन क्रमांक ५८वरून पुन्हा चारवर

भिक्खूंचे बांगलादेशच्या सीमेवर आंदोलन

●बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी या हिंदू नेत्याच्या सुटकेसाठी आणि बांगलादेशात अल्पसंख्याकांवरील अत्याचाराविरोधात भारत-बांगलादेश सीमेवर पेट्रापोल सीमेपासून आठशे मीटर अंतरावर अखिल भारतीय संत समितीच्या नेतृत्वाखाली भिक्खूंनी निदर्शने केली.

बांगलादेशमधील हंगामी सरकारशी बोलून, गरज असेल, तर आंतरराष्ट्रीय शांतिसेना बांगलादेशात सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी पाठवावी. तेथे छळ होणाऱ्या भारतीयांना तातडीने भारतात आणणे आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची तातडीने आवश्यकता आहे. – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

पर्यटकांच्या संख्येत घटनवी

दिल्ली: बांगलादेशमधून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत घटल्याचे पर्यटन मंत्रालयाने लोकसभेत सांगितले आहे. पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी सांगितले, की जानेवारी ते ऑगस्ट या काळात गेल्या वर्षाच्या तुलनेत बांगलादेशातदेखील कमी प्रवासी गेले आहेत. १२ लाख ८५ हजार ७८३ पर्यटक बांगलादेशला गेले आहेत. गेल्या वर्षी हाच आकडा १४ लाख १५ हजारांवर होता.

Story img Loader