पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यात पुन्हा एकदा खडाजंगी निर्माण झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केंद्रीय यंत्रणांच्या छापेमारीवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. तसेच, बंगालमध्ये कार्यरत असलेल्या केंद्र सरकारच्या अधिकाऱ्याविरोधात चौकशी सुरु करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर आता दुसऱ्याचं दिवशी मंगळवारी ईडीने ममता बॅनर्जी यांच्या पुतण्याला समन्स पाठवलं आहे. कोळसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जीला समन्य बजावलं आहे.
कथित कोळसा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जीला २ सष्टेंबर रोजी कोलकाता कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. यापूर्वी सुद्धा मार्च २०२२ मध्ये याचप्रकरणी अभिषेक बॅनर्जी नवी दिल्लीत ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले होते.
आधी ममता बॅनर्जींचा केंद्र सरकारला इशारा, दुसऱ्याच दिवशी पुतण्याला ईडीचं समन्स
ED Summons Abhishek Banerjee : पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या कारवाईवरुन ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुतणे अभिषेक बॅनर्जीला ईडीनं समन्स बजावलं आहे.
Written by अक्षय साबळे
नवी दिल्ली
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-08-2022 at 19:27 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bengal coal scam case ed summons tmc leader abhishek banerjee after cm mamata banerjee threatens central governmenta ass