पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेला विजय हा सर्वसामान्य जनतेने मिळवून दिल्याचे सांगत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. यासोबतच पश्चिम बंगाल हे राज्य भ्रष्टाचार मुक्त राज्य असल्याच गर्व वाटत असल्याचेही त्या म्हणाल्या.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षाला गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागांवर यश मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन प.बंगालमधील जनतेचे आभार व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, आमच्या विरोधात गेल्या दोन वर्षात विविध प्रकारचे आरोप लावण्यात आले. मात्र जनतेने त्या प्रचाराला नाकारत आम्हाला विजय मिळवून दिला. राज्यात जनतेची दिशाभूल करण्याचा आणि त्यांना घाबरविण्याचा प्रयत्न झाला. पण जनतेने शांततेत मतदान केले. पश्चिम बंगाल हे देशातील भ्रष्टाचार मुक्त राज्य असल्याचा मला गर्व वाटतो, असा दावा देखील ममता यांनी केला.
Election Result LIVE : पश्चिम बंगालमध्ये ममतांची सरशी, विरोधक सपाट
दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत दिले असून, येत्या २७ मे रोजी शपथविधी सोहळा होणार आहे.